सुपरस्टार सलमान खानला इंडस्ट्रीत अनेक नावांनी ओळखले जाते. त्यापैकी सर्वात लोकप्रिय असलेले नाव म्हणजे ‘भाईजान’. सलमानला त्याचे चाहते आणि त्याचे इंडस्ट्रीतील अनेक सहकारी भाईजान म्हणून संबोधतात. मात्र, अलीकडेच अभिनेत्री सारा अली खानने त्यांना आयफा अवॉर्ड्समध्ये अंकल म्हटले, त्यानंतर अभिनेत्याचा चेहरा पाहण्यासारखा होता.(Salman Khan, Sara Ali Khan, Uncle, IIFA Awards,)
खरं तर, ‘आयफा अवॉर्ड्स २०२२’चे आयोजन अबू धाबीमध्ये करण्यात आले होते, जिथे अनेक बॉलिवूड स्टार्स जमले होते. २५ जून रोजी हा अवॉर्ड शो टीव्हीवरही प्रसारित होणार आहे. दरम्यान, शोचे अनेक प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत. यातील एक व्हिडिओ असा आहे की, सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे.
या व्हिडिओमध्ये सारा अली खान सलमान खानला अंकल म्हणून बोलत असल्याचे दिसून येते, त्यानंतर सलमान खानचे तोंड बंद पडते. सलमान हातवारे करत म्हणतो, ‘तुझा पिक्चर गेला’, त्यानंतर सारा म्हणते ‘माझा पिक्चर का गेला’. यानंतर सारा म्हणते की, ‘तुम्हीच तर बोलले अंकल म्हणून बोल असे सांगितले.
हे ऐकल्यानंतर कार्यक्रमाला आलेल्या सर्व स्टार्सना आपले हसू आवरता आले नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान आणि सारा देखील या मजेशीर घटनेचा आनंद घेऊ लागले आहेत. त्यानंतर हे दोघे १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’ चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसतील.
व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘साराने सलमानला चिडवले’. दुसरा म्हणाला, ‘हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही’. बरेच लोक साराच्या विनोदाची प्रशंसा करत आहेत आणि तिला मनोरंजक असल्याचे सांगत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेस.
महत्वाच्या बातम्या
“शिंदे साहेब म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही, फक्त स्वत:ची काळजी घ्यायची अन् बरे व्हायचं”
बंडखोर आमदारांच्या मुलांची युवासेनेच्या पदांवरून होणार हकलपट्टी; सेना पदाधिकाऱ्यांचे आदित्य ठाकरेंना निवेदन
VIDEO: भीषण अपघातानंतरही उभा राहून करू लागला विचित्र गोष्टी, लोकं म्हणाले, ‘भूत शिरलं आहे वाटतं’






