अरे देवा! सारा मोठ्या भावाला तर जान्हवी छोट्या भावाला करत होती डेट; ‘या’ व्यक्तिमूळे झाले ब्रेकअप

बॉलीवूडमध्ये सध्याच्या नवीन जनरेशनमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर खुप यशस्वी अभिनेत्री आहेत. दोघींचा मोठा चाहता वर्ग आहे. खुप कमी वेळेतच दोघींनी इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. खुप कमी वेळेत यशाच्या शिखरावर गेलेल्या दोघीं आज एकमेकींसाठी स्पर्धा बनल्या आहेत.

जान्हवी कपूर बॉलीवूडची चांदनी श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूरची मुलगी आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये येण्या अगोदरपासूनच जान्हवी खुप प्रसिद्ध आहे. श्रीदेवीचे चाहते जान्हवीमध्ये त्यांची झलक बघत असतात. त्यामुळे अनेकदा जान्हवीला श्रीदेवीची सावली बोलले जाते.

दुसरीकडे सारा नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे. त्यामुळे तिला देखील इंडस्ट्रीमध्ये चांगलीच ओळख आहे. सारा तिची आई अमृतासारखी दिसते. म्हणून तिचा देखील वेगळा चाहता वर्ग आहे. एवढेच नाही तर साराचा गोड स्वभाव तिच्या चाहत्यांना खुप आवडतो.

साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. तर जान्हवीने ‘धडक’ चित्रपटातून डेब्यु केला होता. दोघींचे चित्रपट चांगले यशस्वी झाले होते. सारा आणि जान्हवीला बॉलीवूडची पुढे पिढी बोलले जात आहे.

इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्यांच्या दोघींच्या अफेअरच्या बातम्या येत होत्या. वेळोवेळी अनेक कलाकारांसोबत दोघींचे नाव जोडले गेले आहेत. पण खुप कमी लोकांना माहीती आहे की आज एकमेकींच्या स्पर्धेक असणाऱ्या ह्या दोघी एकेकाळी एकाच घरातील मुलांना डेट करत होत्या.

बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर कॉलेजच्या दिवसांमध्ये त्या एकाच घरातील मुलांना डेट करत होत्या. त्यांचे नातं यशस्वी झाले असते तर आज त्या एकाच घरातील सुना झाल्या असत्या. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल पण ही गोष्ट खरी आहे.

कॉलेजच्या दिवसांमध्ये सारा अली खान वीर पहाडियाला डेट करत होती. दोघांच्या प्रेम प्रकरणांनी खुप जास्त लाईमलाईट मिळवली होती. सगळीकडे दोघांच्या नात्याच्या चर्चा सुरू होत्या. वीर आणि साराचे एकमेकांवर खुप जास्त प्रेम होते.

नेहमी दोघांना एकत्र पाहिले जात होते. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत होते. सारासोबत जान्हवी कपूर देखील याच घरातील मुलगा शिखर पहाडियाला डेट करत होती. शिखर वीरचा छोटा भाऊ होता. जान्हवी आणि शिखरच्या बातम्यांनी देखील वेळोवेळी लाईमलाईट मिळवली होती.

वीर आणि शेखर पहाडिया माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेचे नातू आहेत. त्यांच्या कुटुंबाचे राजकारणात खुप मोठे नाव आहे. जान्हवी आणि शेखरच्या अफेअरच्या बातम्या दिवसेंदिवस वाढतच होत्या. त्यामुळे श्रीदेवी खुप चिडल्या होत्या.

श्रीदेवीने जान्हवीला करिअरवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी जान्हवी आणि शिखरचे ब्रेकअप केले. ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये पसरली होती. त्यानंतर अमृता सिंगने देखील साराला वीरसोबत ब्रेकअप करून करिअरवर लक्ष देण्यास सांगितले. श्रीदेवी आणि अमृतामूळे जान्हवी व सारा एका घराण्यातील सुना होता होता राहिल्या.

महत्वाच्या बातम्या –

‘मक्कडी’ चित्रपटातील अभिनेत्रीने केले स्वीकार; म्हणाली, मी पैशांसाठी देहविक्री करत होते पण नंतर मात्र….

‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्री झाली होती घरेलू हिंसाचाराची शिकार; स्वत: केला होता ‘हा’ मोठा खुलासा

नवाब सैफ अली खानच्या बायकोचे होते ‘एवढ्या’ लोकांसोबत अफेअर

पहा मराठमोळ्या अलका कुबलच्या नवऱ्याचे फोटो; आहे प्रसिद्ध फोटोग्राफर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.