सारा अली खान आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते; मित्राचे धक्कादायक खुलासे

मुंबई | सुशांतसिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सर्व जबाबदारी सीबीआयकडे दिली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी जोर पकडला आहे.

दरम्यान, आता सुशांतचा मित्र सॅम्युएल होकीपणे सुशांतच्या नात्याबद्दल अजून एक धक्कादायक बाब सांगितली आहे. जेव्हा सुशांत आणि सारा अली खान केदारनाथ चित्रपटाचे शुटिंग करत होते तेव्हा पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्या दोघांना वेगळे करणे कठीण होते.

दोघांचे नाते शुद्ध आणि निर्दोषपणाने मुक्त होते. सुशांत आणि सारा यांना एकमेकांबद्दल खूप आदर होता जो आज क्वचितच दिसतो. सारा त्याच्या कुटुंबातील सर्व कर्मचारी आणि मित्र यांचा आदर करते. सोनचिरियाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीनंतर सारा अली खानने सुशांतसिंह राजपुतबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय कसा घेतला याचे मला आश्चर्य वाटते.

हे बॉलीवूड माफियांनी बनवलेल्या कोणत्याही प्रकारच्या दबावामुळे होतं का ? हे अजूनही स्पष्ट नाही झाले. सॅम्युएलच्या या दाव्यानंतर सगळे थक्क झाले आहेत. सुशांतच्या मृत्यूबद्दल सारा कधीही उघडपणे बोलली नाही.

केदारनाथ या चित्रपटात तिने सुशांतबरोबर डेब्यु केला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.