प्रेग्नेंसीनंतर सपना चौधरीने धरला ताल; सोशल मिडीयावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

मुंबई : हरियाणवी डान्स क्वीन म्हणून ओळखली जाणारी सपना चौधरीचे करोडो डान्स फॅन्स आहेत. सपना स्टेजवर परफॉर्म करत असेल किंवा व्हिडीओ अल्बममध्ये नेहमी ती नेहमी पारंपरिक अंदाजातच पाहायला मिळते. सपना नेहमीच आपल्या दिलखेचक डान्सने रसिकांची मनं जिंकत असते.

सपना नुकतीच आई झालीये त्यामुळे तिचे चाहते तिची परत येण्याची वाट पहात होते. अशातच सपनाने प्रसूतीनंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या डान्सचा स्टेज परफॉरमन्स व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन ती दणक्यात नाचताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपना आई झाल्यानंतर पहिल्यांदाच स्टेजवर दिसली असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, ‘सॉलिड बॉडी’ हे सपना गाणं सुपरस्टार बनवलं होतं. विशेष बाब म्हणजे या गाण्यानंतर तिचे कोट्यावधी फॉलोअर्स झाले. ती लोकांमध्ये इतकी लोकप्रिय आहे की २०१७ मध्ये सपना चौधरी गुगलनं जाहीर केलेल्या टॉप एन्टरटेनरच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचली.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपाची रणरागिणी कडाडली; ‘संजय राठोडांची चौकशी होत नाही, तोपर्यंत…’
ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेंडला भेट द्यायला चोरलं उंटाचं पिल्लू; अन्…
शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.