Sharad Pawar : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश होता. पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी पुण्यात आणण्यात आले. पुणे विमानतळावरून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी नेण्यात आले.
या दुर्दैवी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार(Sharad Pawar) यांनी संतोष जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी मृताच्या पत्नी आणि मुलीशी संवाद साधला.
संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार(Sharad Pawar) यांना हल्ल्याच्या वेळची भयावह घटना सांगितली. “दुपारी साडेतीनच्या सुमारास हल्ला झाला. आमचा काश्मीरमधील पहिलाच दिवस होता. दहशतवाद्यांनी तोंडावर मास्क घातले होते. पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घोडेवाल्यालाही त्यांनी मारले,” असे त्या म्हणाल्या. “दहशतवाद थांबला पाहिजे, आज माझा नवरा माझ्यासोबत नाही,” असा भावनिक उद्गार त्यांनी काढला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “दहशतवाद्यांनी संतोष यांच्या डोक्यात गोळी घातली. मृतदेह इतका विद्रूप झाला होता की आम्हाला चेहरा देखील पाहू दिला गेला नाही. आम्ही न्याय मागतोय. त्या दहशतवाद्यांना शोधून ठार करा. त्यांनी आमच्या डोळ्यांसमोर आमचं सर्व काही हिरावून नेलं.”
या हल्ल्यात महाराष्ट्रातील खालील सहा व्यक्ती मृत्युमुखी पडल्या:
1. अतुल मोने – डोंबिवली
2. संजय लेले – डोंबिवली
3. हेमंत जोशी – डोंबिवली
4. संतोष जगदाळे – पुण
5. कौस्तुभ गणबोटे – पुणे
6. दिलीप देसले – पनवेल
तर जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
1. एस. बालचंद्रू
2. सुबोध पाटील
3. शोबीत पटेल
हा हल्ला केवळ एक दहशतवादी कृती नव्हे, तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर आघात करणारा काळा दिवस ठरला आहे.
santosh-jagdales-wifes-message-to-sharad-pawar