Share

सिद्धू मुसेवालची हत्या करणाऱ्या संतोष जाधवचा पुण्यातला भयानक इतिहास वाचून हादरून जाल

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते ​​सिद्धू मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येची जबाबदारी बिष्णोई गॅंग आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सध्या पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. सिद्धू मुसेवाला(Sidhu Musewala) यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. (santosh jadhav keeping status facebook and murder man)

आता पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आले आहे. पुण्यामधील आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यातील दोन शूटर्सचा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी या दोन शूटर्सची नावे आहेत.

संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. तर सौरभ महाकाळ हा जुन्नर तालुक्यातील गुन्हेगार आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल झाले आहेत. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोघांवर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खंडणी आणि खुनाच्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

संतोष जाधव हा मूळचा आंबेगाव तालुक्याच्या डोंगरी भागातील पोखरी गावचा रहिवासी आहे. संतोष जाधव याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कुख्यात गुन्हेगार संतोष जाधव सध्या फरार आहे. संतोष जाधवच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याची आई पोखरी गाव सोडून मंचरमध्ये राहू लागली.

१६ वर्षांचा असताना संतोष जाधवने कळंबचे माजी सरपंच साळवे यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात संतोष जाधवला पोलिसांकडून अटक देखील झाली होती. त्यानंतर आणखी एका प्रकरणात संतोष जाधववर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी संतोष जाधवला अटक केली होती.

त्यानंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर संतोष जाधव याने राण्या आण्णासाहेब बाणखेले यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात राण्या आण्णासाहेब बाणखेले याचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संतोष जाधव फरार झाला होता. राण्या आण्णासाहेब बाणखेले याच्यावर गोळीबार करण्यापूर्वी संतोष जाधव याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती.

“सूर्य उगवण्याआधी तुला संपवतो”, असे स्टेट्स संतोष जाधव याने सोशल मीडियावर शेअर केले होते. या स्टेट्सला राण्या आण्णासाहेब बाणखेले याने प्रत्युत्तर दिले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद देखील झाला होता. या वादातून संतोष जाधव याने राण्या आण्णासाहेब बाणखेले याच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर संतोष जाधव फरार झाला होता.

संतोषला पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्येही गेले होते. पण तिथूनही तो फरार झाला होता. त्यानंतर महाकाळसोबत त्याची मैत्री जमली आणि ते संघटीत गुन्हेगारी करु लागले. त्यामुळे पुणे पोलिस आता या दोघांच्या शोधात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ महाकाळला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘त्या’ दिवशीच्या प्रदीप भिडेंच्या निवेदनाने अख्खा महाराष्ट्र रडला होता; काय होता तो प्रसंग? वाचा..
ना धोनी ना विराट, फक्त मिताली राजच्या नावावर आहे ‘हा’ रेकॉर्ड, मोडणे आहे कठीण
‘या’ कारणामुळे मला माझी ब्रा धुवायला आवडत नाही’; सई ताम्हणकरच्या वक्तव्याने खळबळ

ताज्या बातम्या क्राईम राज्य

Join WhatsApp

Join Now