Share

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार? उज्ज्वल निकमांचा मोठा गौप्यस्फोट

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या खुनाच्या प्रकरणात (Murder Case) महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) याच्या दोषमुक्ती व प्रॉपर्टी जप्तीबाबतचा निर्णय येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. बीड न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे विशेष वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी उपस्थित राहून बाजू मांडली.

आजच्या सुनावणीत केवळ दोषमुक्ती नव्हे तर आरोपींच्या संपत्तीवरील सील काढण्याचा मुद्दाही चर्चेत होता. सरकारी वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले की, यासंदर्भातील सर्व अर्जांचा निर्णय २२ जुलै रोजी होणार आहे.

नाशिक तुरुंगात हलवणार का? उज्ज्वल निकम यांचे उत्तर

वाल्मिक कराड याला बीडमधून नाशिक (Nashik) येथील कारागृहात हलवण्याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं असतानाच उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, “तो निर्णय तुरुंग प्रशासनाचा (Prison Authority) आहे. न्यायालयात यासंदर्भात कुठलाही अर्ज आलेला नाही. सध्या कराड बीड जिल्हा कारागृहातच (Beed District Jail) आहे.”

सरकारी बाजूने प्रॉपर्टी जप्तीची जोरदार मागणी

उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं की, “सरकारकडून आरोपींच्या बँक खाती व मालमत्तांवर सील लावण्याची मागणी केली आहे. गुन्ह्याशी संबंधित असल्याचा संशय असल्याने ही कारवाई आवश्यक मानली जाते. न्यायालयाने यावर युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे.”

वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांची बाजू

वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे (Vikas Khade) यांनी सांगितलं की, “दोषमुक्तीसाठीचा अर्ज आधीच दाखल करण्यात आला होता. आज बँक खाते आणि प्रॉपर्टीवरील सील हटवण्याचीही मागणी करण्यात आली. हे खाते वा प्रॉपर्टी कोणत्याही गुन्ह्यातून मिळवलेली नाहीत. त्यांचा आणि गुन्ह्याचा काहीही संबंध नाही, असा आमचा युक्तिवाद आहे.”

२२ जुलैचा निकाल ठरणार निर्णायक

या प्रकरणातील २२ जुलै रोजीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. दोषमुक्तीबरोबरच संपत्ती जप्तीबाबत कोर्ट काय निर्णय देते, याकडे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now