Share

Sankarshan Karhade: ‘…अन् मन लावून चहा विकणारा होतो पंतप्रधान’, संकर्षण कऱ्हाडे यांची भन्नाट कविता रसिकांच्या पसंतीस

Sankarshan Karhade: मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वगुणसंपन्न कलाकार संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हे आपल्या अभिनयाबरोबरच प्रभावी आणि विनोदी कवितांमुळे सतत चर्चेत असतात. सूत्रसंचालक, लेखक, दिग्दर्शक आणि कवी अशा अनेक भूमिकांमध्ये ते सहजपणे वावरतात. त्यांच्या कवितांना रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद इतका प्रचंड आहे की ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा त्यांचा आणि स्पृहा जोशी (Spruha Joshi) यांचा कवितावाचन कार्यक्रम प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरतो.

अलिकडेच या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade Marathi Kavita) यांनी सादर केलेली त्यांची नवी कविता काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल झाली. कलाकारांना अनेकदा भेटणाऱ्या विचित्र पण मजेशीर चाहत्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या मनात रेंगाळत राहतात. त्यातूनच ही कविता जन्माला आल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले. “चारचा चहा घ्या आणि ताजी कविता ऐका,” अशा मिश्किल कॅप्शनसह त्यांनी ती इंस्टाग्रामवर शेअर केली.

कवितेची सुरुवात एका चाहत्याच्या निरागस तक्रारीने होते, “हल्ली कविता दिसत नाही, सुचत नाही की काय?” या वाक्याने संकर्षण विचारात पडतात आणि कागद-पेन घेऊन कविता लिहायला बसतात. पण शब्द काही केल्या सुचत नाहीत. याच गोंधळात त्यांच्या पत्नीचा टोमणा “सकाळपासून तेरा कप चहा पिऊन बसलाय” हा कवितेचा विषय ठरतो: चहा.

यानंतर कवितेमध्ये चहाचे विविध प्रकार आल्याचा, गुळाचा, साखरेचा, टपरीचा, चुलीवरचा, इराणी, मटका, काळा यांची विनोदी यादी येते. क्रिकेटमधील टी-टाइमपासून राजकारणातील ‘चहापान’पर्यंत चहा वेगवेगळ्या ठिकाणी कसा पोचतो हेही ते हलक्याफुलक्या शैलीत सांगतात. “मन लावून चहा विकणारा होतो पंतप्रधान,” ही ओळ तर प्रेक्षकांनी दाद देत उचलून धरली.

कवितेच्या शेवटी चौदावा चहा आणत त्यांच्या पत्नीचा प्रश्न “आणखी किती चहा देऊ?” यावर संकर्षण प्रेमाने म्हणतात, “हा चहा आपण अर्धा अर्धा पिऊ.” त्यांच्या लाइव्ह वाचनादरम्यान प्रेक्षकांकडून प्रत्येक ओळीवर मिळालेली टाळ्यांची दाद आणि सोशल मीडियावरील कौतुकाच्या कमेंट्समुळे ही कविता सर्वांच्या चर्चेत आली आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now