…म्हणून संजीव कुमारने एकाच चित्रपटात निभालवे होते नऊ पात्र

इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी त्यांचे स्टारडम शेवटपर्यंत टिकवून ठेवले आणि आजही ते स्टार म्हणूनच ओळखले जातात. असेच एक अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. ९८ वर्षांचे दिलीप कुमार आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

दिलीप कुमारला हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील काही मोठ्या कलाकारांमध्ये गणले जाते. त्यांचे नाव बॉलीवूडच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहीले जाईल. या यशापर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी कधीच सोपे नव्हते. इंडस्ट्रीमध्ये नाव कमवण्यासाठी त्यांना स्वत:चे खरे नावही बदलावे लागले होते.

पण तरीही त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांना इंडस्ट्रीतील सर्वात मोठे अभिनेते मानले जाते. दिलीप कुमार मात्र दुसऱ्याच कोणत्या तरी अभिनेत्याला सर्वोत्तम अभिनेता मानतात. ते अभिनेते म्हणजे संजीव कुमार.

आजही दिलीप कुमार संजीव कुमारला त्यांच्या पेक्षा मोठे अभिनेता मानतात. दोघांनाही इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांचा ताज मिळाला आहे. पण दिलीप कुमार मात्र नेहमीच संजीव कुमारला उत्तम समजायचे. म्हणूनच त्यांनी त्यांच्याकडे आलेला चित्रपट नाकारला आणि त्या चित्रपटासाठी संजीव कुमारचे नाव सुचवले.

हा किस्सा आहे १९७३ सालचा. दिग्दर्शक ए भीष्म सिंग त्यांच्या एका चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन दिलीप कुमारकडे गेले होते. चित्रपटात त्यांना नऊ वेगवेगळ्या भुमिका साकारायच्या होत्या. हे समजताच दिलीप कुमारने चित्रपटाला नकार दिला.

त्यांनी दिग्दर्शकाला दुखी न करता. या चित्रपटासाठी एका चांगल्या अभिनेत्याचे नाव सुचवले. दिलीप कुमार दिग्दर्शकाला म्हणाले होते की, ‘हा चित्रपट चांगला आहे. पण एवढ्या भुमिका नाही साकारु शकत. माझ्यासाठी ही गोष्ट अशक्य आहे’.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘पण हा… या चित्रपटासाठी मी तुम्हाला संजीव कुमारचे नाव नक्की सांगेण. कारण ते एकमेव असे अभिनेते आहेत जे अशा प्रकारच्या भुमिका चांगल्या प्रकारे साकारु शकतात. म्हणून मी तुम्हाला त्यांना या चित्रपटात घेण्याची विनंती करतो’.

ज्यावेळी दिग्दर्शक संजीव कुमारकडे चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांना चित्रपटाची स्टोरी आवडली नाही. पण तरीही त्यांना चित्रपटाला नकार देता आला नाही. कारण दिलीप कुमारने त्यांचे नाव सांगितले होते.

१९७४ मध्ये रिलीज झाले ‘नया दिन नयी रात्र’ चित्रपटात संजीव कुमार नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या भुमिकांमध्ये दिसले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल करु शकला नाही. तरी देखील संजीव कुमारने हा चित्रपट करुन त्यांची दिलीप कुमारसोबत असलेली मैत्री निभावली होती.

महत्वाच्या बातम्या –
‘शोले’ चित्रपटातील गब्बरचा लुक रमेश सिप्पीने नाही तर आमजद खानने केला होता डिझाइन
‘हम आपके है कौन’ चित्रपटात सलमान खानच्या मागे पळणारी रिटा आठवते का? आज दिसते ‘अशी’
रोहित शेट्टी बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर झाले होते फिदा; पत्नीला सोडण्याची केली होती तयारी
अभिनेत्री रेखा शारीरीक संबंधावर असे काही म्हणाल्या की, लोकांनी दिल्या शिव्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.