हेमा मालिनीच्या प्रेमात पागल झाले होते संजीव कुमार काहीही करायला होते तयार

अनेक सुंदर अभिनेत्र्या आहेत ज्यांनी आपल्या सुंदरतेने लोकांची मने जिंकून घेतली आहेत. बॉलीवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीचे करोडो चाहते आहेत. फक्त सामान्य माणसचं नाही तर बॉलीवूडचे मोठे मोठे कलाकार देखील बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडतात.

पण अनेक वेळा अभिनेत्यांना त्यांचे खरे प्रेम मिळत नाही. असेच काही अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबत देखील झाले होते. संजीव कुमार हे बॉलीवूडचे खुप मोठे नाव आहे. त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने खुप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली होती.

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जात होते. अभिनयामूळे ते प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत होते. पण संजीव कुमारच्या हृदयावर मात्र हेमा मालिनीचे राज्य होते.

संजीव कुमार पाहताच क्षणी हेमा मालिनीच्या प्रेमात पडले होते. त्यांना हेमाच्या सुंदरतेने वेड लावले होते. संजीव कुमारने हेमाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांना तसे करता आले नाही. कारण अनेक अभिनेते हेमा मालिनीच्या प्रेमात पागल झाले होते.

असे बोलले जाते की, हेमा मालिनीसोबत टाईम घालवता येईल म्हणून संजीव कुमारने ‘सीता और गीता’ चित्रपट साइन केला होता. या चित्रपटाच्या शुटिंग वेळी या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. संजीव कुमार हेमा मालिनीला लग्नासाठी प्रोपोज करणार होते.

पण संजीव कुमारला भीती वाटत होती. म्हणून त्यांनी जितेंद्रची मदत घेतली. त्यांना वाटले की, जितेंद्र हेमा मालिनीला त्यांच्या मनातील भावना सांगतिल. पण जितेंद्र तसे करू शकले नाहीत.

कारण हेमा मालिनीला भेटल्यानंतर जितेंद्र स्वतः च हेमाच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे त्यांनी संजीव कुमारबद्दल हेमाला काहीही सांगितले नाही. जितेंद्रने हेमाशी लग्न करण्याचा विचार केला.

ही गोष्ट संजीव कुमारला समजली तेव्हा त्यांना खुप जास्त राग आला. जितेंद्र आणि संजीव या दोघांमध्ये वाद देखील झाले होते. म्हणून त्या दोघांनी हेमाला आपापल्या मनातल्या भावना सांगण्याचा विचार केला. तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला.

कारण ज्या हेमा मालिनीच्या प्रेमात हे दोघे पागल झाले होते. त्या हेमा मात्र जितेंद्रच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. त्यांनी या दोघांचे प्रेम नाकारले. असे बोलले जाते की, जितेंद्रसोबत हेमाचे लग्न होणार होते. पण धर्मेंद्रने ते होऊ दिले नाही.

हेमा मालिनीने धर्मेंद्रसोबत लग्न केले. तर जितेंद्र यांनी देखील शोभासोबत लग्न केले. पण संजीव कुमार मात्र आयुष्यभर अविवाहित होते. बॉलीवूडमध्ये असे बोलले जाते की, हेमा मालिनीमूळे संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

रातोरात सुपरस्टार झालेली संदली सिंन्हा अचानक बॉलीवूडमधून गायब का झाली?

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी दुसऱ्या धर्मातील मुलींशी लग्न केले आहे

३० वर्ष बॉलीवूडमध्ये असूनही गोविंदासोबत ‘असे’ वागतात बॉलीवूडचे कलाकार

त्या गोष्टीचा सूड राजेश खन्नांनी उगवला; करोडोंच्या संपत्तीतील फुटकी कवडीसुद्धा डिंपलला दिली नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.