भारतीय संघाचा मेंटॉर बनताच धोनीला काढण्यासाठी षड्यंत्र सुरु; बीसीसीआयकडे तक्रार दाखल

नुकतीच टी २० क्रिकेट वर्ल्ड कपचा भारतीय संघ निवडण्यात आला आहे. पण या निवडीत सर्वात जास्त चर्चा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची होत आहे. ८ सप्टेंबरच्या रात्री बीसीसीआयने माजी कर्णधार धोनीला टी 20 विश्वचषक खेळण्यासाठी जाणाऱ्या टीम इंडियाचा मार्गदर्शक बनवले.

मार्गदर्शक बनवल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. पण ८ सप्टेंबरलाच त्याच्या विरोधात हितसंबंधांच्या संघर्षाची तक्रार आली. या प्रकरणाची तक्रार बीसीसीआय सर्वोच्च परिषदेकडे आल्याची माहिती मिळत आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी ही तक्रार केली आहे. गुप्ता यांनी यापूर्वीही अनेक खेळाडू आणि प्रशासकांविरुद्ध अशा तक्रारी दाखल केल्या आहेत. आता त्यांनी सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांना एक पत्र लिहिले आहे की धोनीची नियुक्ती हितसंबंधांच्या संघर्षात येते कारण एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही.

धोनी आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे या आधारे गुप्ता यांनी ही तक्रार केली आहे. अशा स्थितीत त्याला भारतीय संघाचा मेंटॉर होणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणावर बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला याबाबत माहिती दिली आहे.

होय, गुप्ता यांनी सौरव गांगुली आणि जय शाह समेह सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी बीसीसीआयच्या घटनेच्या कलम ३८ (४) चा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की एखादी व्यक्ती दोन भिन्न पदांवर राहू शकत नाही. या प्रकरणी सर्वोच्च परिषदेला कायदेशीर संघाशी बोलावे लागेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

साहजिकच धोनी एका संघाचा कर्णधार आणि त्याच्या संघाच्या खेळाडूंच्या हिताशी संबंधित दुसऱ्या संघाचा मार्गदर्शक असल्याने प्रश्न निर्माण होतील आणि याच्या स्पष्टीकरण मिळणे गरजेचे आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्वतः धोनीला मेंटॉर बनवण्याची घोषणा केली होती. आता या आक्षेपावर शहा काय निर्णय घेतात हे पाहणे बाकी आहे.

तुम्हाला माहिती आहेच, धोनी भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आता केवळ आयपीएलमध्ये खेळतो.

महत्वाच्या बातम्या-

दुखा:त बुडालेल्या अक्षयच्या सांत्वनासाठी शिल्पा शेट्टी, करण जोहरसह बाॅलीवूड कलाकारांची रीघ
काय सांगता! २५ पुरुषांसोबत अनेकवेळा पळाली बायको, मात्र तरीही पती लावतो जीव
एकेकाळी ‘या’ व्यक्तीची तोंडभरून स्तुती करणारी ऐश्वर्या आज ‘त्या’ व्यक्तीचा चेहरा देखील पाहत नाही कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.