Sanjay Shirsat : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना उलटून गेल्यांनतर अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. आज एकूण १८ आमदारांचा शपथविधी पार पडला. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा इत्यादी नेत्यांनी शपथ घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांना बंडखोरीत मदत करणाऱ्या आमदारांच्या यादीत संजय शिरसाट यांचेही नाव होते. त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा संजय शिरसाट यांना होती. मात्र, यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातून सरळसरळ त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
मात्र, आता संजय शिरसाट यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी नाराज नाही. आम्ही शिंदे यांच्यासोबत असून त्यांची भूमिका आम्हाला मान्य आहे. त्यामुळे नाराज होण्याचे काहीही कारण नाही,” असे संजय शिरसाट म्हणाले आहे.
तसेच भाजप-शिवसेना युती असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना अनेक अडचणी येत असतात. त्याप्रमाणे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात होणाऱ्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी अनेकांचा समावेश होणार असल्याने आज नाराज होण्याचे कोणतेच कारण नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आमची बैठक घेतली असून त्यांची भूमिका समजावून सांगितली आहे. त्यासोबतच आमची भूमिकादेखील समजून घेतली आहे. त्यामुळे नाराजीचा कोणताही प्रश्न नसल्याचेही संजय शिरसाट म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
TET परीक्षेत अपात्र असतानाही अब्दुल सत्तारांच्या मुलीला २०१७ पासून मिळतोय सरकारी पगार
Bacchu Kadu: ‘आमच्याशिवाय सरकार चालू शकत नाही..’; मंत्रीपद नाकारल्यानंतर बच्चू कडूंनी थोपटले दंड
बिहारमधील भाजप-जेडीयूचे सरकार कोसळले; नितीशकुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
अंगात त्राण नसताना, ताप असताना आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; म्हणाले…






