Share

Sanjay Shirsat : मंत्रीपद नाकारल्यानंतर संजय शिरसाटांना पुन्हा धक्का; एकनाथ शिंदेंनी पुन्हा डावललं

Sanjay Shirsat Eknath Shinde

Sanjay Shirsat : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता संजय शिरसाट यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा डावलल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.

शिंदे गटाच्या उपनेत्यांच्या यादीतून संजय शिरसाट यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी डावलल्याने संजय शिरसाट पुन्हा नाराज होतील का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदारांमध्ये संजय शिरसाट हेदेखील एक प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी सर्वांना आशा होती. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना सामील केले गेले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते.

त्यानंतर आता नुकतीच शिंदे गटाच्या उपनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात २६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना यात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ही नेतेपदी आणि उपनेतेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी नेतेपदी ५ जणांची तर उपनेतेपदी २६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात संजय शिरसाट यांचे नाव नसल्याने त्यांच्या नाराजीत भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

तसेच उपनेतेपदी उदय सामंत, दादाजी भुसे, अनिल बाबर, शंभूराज देसाई, भरत गोगावले, तानाजी सावंत, सदा सरवणकर, गोपीकिसन बाजोरिया, ज्ञानराज चौगुले, यशवंत जाधव, श्रीरंग बारणे, अर्जुन खोतकर, शीतल म्हात्रे, दीपक केसरकर, चिमणराव पाटील, शहाजीबापू पाटील, विजय नाहाटा, हेमंत पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, रवींद्र फाटक, राहुल शेवाळे, शरद पोंक्षे, संजय राठोड, संध्या वढावकर, विजय शिवतारे, कृपाल तुमाने यांना नियुक्त करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
Asad Rauf : क्रिकेटचे पंच असद रऊफ यांचा भयानक शेवट; शेवटच्या दिवसातील अवस्था वाचून येईल डोळ्यात पाणी
Foxconn: …तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती; वेदांताबाबत देसाईंचा मोठा खुलासा
shinde group : ४० गद्दारांनी शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ फावड्यांनी…; शिवसेनेची शिंदेगटाला जाहीर धमकी
Mumbai: मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने २२७ दवाखाने सुरु करणार, रुग्णांना मिळणार मोफत उपचार

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now