Share

Sanjay Shirsat : सिगारेट हातात, शेजारी पैशांची बॅग, व्हिडीओनंतर संजय शिरसाट यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले….

Sanjay Shirsat : राज्यातील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या एक खासगी व्हिडिओने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये सिगारेट ओढताना दिसत आहेत आणि त्यांच्याजवळ ठेवलेली एक मोठी बॅगही दिसत आहे. विशेष म्हणजे, ही बॅग पैशांनी भरलेली असल्याचा संशय निर्माण झाला असून, त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मागील आरोपांना बळ मिळालं आहे.

पैशांची बॅग ठेवायची असेल तर कपाटं मेली आहेत का?

या चर्चेने उधाण आल्यानंतर संजय शिरसाट यांनी स्वतः या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “हा व्हिडिओ माझ्या घरातला आहे. मी माझ्या बेडवर बसलो होतो, जवळ माझा लाडका कुत्रा होता आणि ती बॅग म्हणजे कपड्यांची बॅग होती. एवढी मोठी रक्कम असल्यास कपाटं मेली आहेत का? मी पैसे ठेवणार असेन तर ते कपाटातच ठेवेन, बेडरूममध्ये मोकळेपणाने कशाला ठेवेन?”

संजय शिरसाट यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधत म्हटलं की, “ही सगळी खोटेपणाची राजकारणं आहेत. पूर्वीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सुरक्षारक्षकांच्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप केला होता. यांना फक्त नोटाच दिसतात. कपडे सुद्धा बॅगेत ठेवले जाऊ शकत नाहीत का?”

शिरसाट पुढे म्हणाले की, “हा व्हिडीओ कोणी काढलाय हे मला माहिती नाही, पण त्यात त्या व्यक्तीचा दोष नाही. माझ्याकडे कोणाला आत घ्यायचं असेल तर चिठ्ठी देऊन घ्यावी लागत नाही. कोणी व्हिडीओ काढलाच तर चालेल, कारण तो काही खासगी गोष्ट नव्हती. या सगळ्या प्रकरणाचा माझ्या राजकीय आयुष्यावर परिणाम होणार नाही. व्हिडीओतील बॅग म्हणजे केवळ कपड्यांची बॅग होती, पैसा नव्हता.”

या संपूर्ण प्रकारामुळे एकंदरीत राजकीय क्षेत्रात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. व्हिडीओची सत्यता काहीही असली तरी संजय शिरसाट यांनी दिलेल्या स्पष्टोक्तीमुळे ही गोष्ट लवकर थांबेल, असं म्हणणं कठीण आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now