Share

Sanjay Shirsat : संजय राऊतांविरोधात संजय शिरसाट वाद कोर्टात रंगणार? मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी

Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले असून, आता त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात मानहानीचा (defamation) खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी शिरसाट यांनी आपल्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे व्हिडीओ प्रकरण?

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या बेडरूममधील एक व्हिडीओ शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena – Thackeray group) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मिडियावर (social media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये शिरसाट यांच्या पलंगाजवळ एक बॅग दिसत असून, त्यात पैशाची बंडलं असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

शिरसाट यांनी हा व्हिडीओ आपलाच असल्याचं मान्य केलं असलं तरी, त्या बॅगेत कपडे होते, पैसे नव्हते, असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रवासावरून आल्यावर कपडे भरलेल्या बॅगेसोबत हा व्हिडीओ घेतला गेला, अशी सफाई त्यांनी दिली.

राऊतांचा इशारा, आणखी व्हिडीओ बाहेर काढणार?

शिरसाट यांनी आरोप फेटाळल्यानंतर संजय राऊत यांनी आणखी व्हिडीओ बाहेर काढण्याचा इशारा दिला. त्यामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शिरसाट यांच्यावर दबाव वाढला असून, त्यांनी आता कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय कट?

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिंदे गटाचे (Shiv Sena – Shinde Group) महत्त्वाचे नेते आणि विद्यमान मंत्री आहेत. व्हिडीओच्या निमित्ताने त्यांच्याविरोधात राजकीय कट रचल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः, हा व्हिडीओ त्यांच्या घरात कोणी काढला आणि तो राऊतांकडे कसा पोहोचला, हे मोठं कोडं बनलं आहे.

संजय शिरसाट यांना याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाकडून (Income Tax Department) नोटीस देखील मिळाली आहे. निवडणुकीदरम्यान त्यांच्या मालमत्तेत झालेल्या वाढीबाबत तपशील मागवण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्यावर आर्थिक आणि राजकीय दडपण वाढले आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now