संजय राऊतांना शिवसेना भवनच्या आत नेऊन फटके देणार; राणेंच्या धमकीने राजकारणात खळबळ

मुंबई। राज्यातील राजकीय वातावरण हे आपण आतापर्यंत अनेक विषयांमुळे तापलेलं पाहिले आहे. कायम सत्ताधारी व विरोधक कोणत्या ना कोणत्या विषयावरून एकमेकांवर टीका करत असतात. व कायम वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. मात्र आता हेच वाद थेट शिवसेना भवन पर्यंत जाऊन पोहचले आहेत.

शनिवारी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी थेट वेळ पडली तर शिवसेना भवन फोडण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यामुळे आता शिवसैनिक चांगलेच भडकले आहेत. अशातच कायम चर्चेत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी प्रसाद लाड यांचा अगदी मोजक्या शब्दांत समाचार घेतला होता.

मात्र त्यानंतर शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचंय तर या मग, असं संजय राऊत यांनी म्हटले होते. याच टीकेला आता निलेश राणेंनी थेट शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ असा इशाराच दिला आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, “हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत,” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

निलेश राणे यांनी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावरही ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत असं म्हणत निलेश राणेंनी सदा सरवणकर यांना टोला लगावला आहे.

त्यामुळे आता प्रसाद यांच्या वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू या वादग्रस्त विधानामुळे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
विचित्र घटना! पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून वाहू लागलं रक्त अन् मग…; वाचा संपूर्ण प्रकरण
महसूल दिनानिमित्त मोठ्या बदलांची घोषणा, जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, जाणून घ्या नवीन बदल..
‘राज कुंद्राला बॉलिवूडप्रमाणे पॉर्न इंडस्ट्रीला मोठं बनवाचं होतं’ ‘ या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
नेहरुंनी १९४७ रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणामुळेच महागाई वाढली – भाजप मंत्र्याचे वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.