संजय राठोड राजीनामा देणार?; संजय राऊतांच्या ‘या’ ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

मुंबई : विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण त्रासदायक ठरू शकते, हे लक्षात घेऊनच वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सूर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणी भाजपाकडून संजय राठोड यांच्यावर आरोप केले जात आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे.  राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले असून यामध्ये राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे.

राऊत यांनी “सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन” असे लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे या ट्विटवरून संजय राऊत यांनी राठोड यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, राऊत यांना या ट्विटबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत. माझी आणि मुख्यमंत्र्यांची दररोज चर्चा होते. मला त्यांना कशाचीही आठवण करुन देण्यासाठी ट्विटची गरज नाही, असे ते म्हणाले.

तसेच ‘माझे ते मित्र आहेत, माझे ते मार्गदर्शक आहेत. माझी त्यांची दररोज चर्चा होते. अगदी आजही सकाळी माझी आणि त्यांची चर्चा झाली. त्यामुळे त्यांना मला काही सांगायचे असल्याचे ट्विटची गरज नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या 

…म्हणून विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला

चित्रा वाघ यांच्या पतीविरुद्धच्या कारवाईला राजकीय रंग; सरकारविरुद्ध राहिल्याचा फटका

संजय राठोडांवर कारवाई व्हायला हवी का? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.