Share

संजय राऊतांनी नवनीत राणांची थेट काढली कुंडली; २०१४ मधील भलतीच FIR कॉपी झाली व्हायरल

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचा डी गँगशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडवाला याच्याकडून नवनीत राणांनी ८० लाखांचे कर्ज घेतले, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावेळी खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी बनावट जात प्रमाणपत्रावरून देखील नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला होता.(sanjay raut tweet FIR copy of navneet rana )

आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये खासदार संजय राऊत यांनी म्हणत नवनीत राणा यांच्याविरोधातील एका FIR ची कॉपी ट्विट केली आहे. ‘तर ते असं आहे’, अशा आशयाचं कॅप्शन खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. २०१४ मध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात एका फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती. FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह कुंडलेस यांना अटक करण्यात आली होती.

जयंत वंजारी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह कुंडलेस यांनी ६-०८ -२०१२ रोजी ढेकाळे, पालघर जि. ठाणे या ठिकाणी मोची जातीचा दाखला मिळवण्यासाठी जन्माची नोंद केली होती. तसेच नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह कुंडलेस यांनी शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार केला होता.

त्यानंतर नवनीत कौर राणा यांचा जातीचा दाखला व्यवस्थित मिळावा म्हणून हरभजनसिंह कुंडलेस यांनी १९९५ च्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मोची जातीचा उल्लेख करून घेतला. तसेच त्याची प्रत देखील सोबत घेतली. याबरोबर हरभजनसिंह कुंडलेस यांनी रेशकार्डवर देखील मोची जातीची नोंद करून घेतली.

त्यानंतर हरभजनसिंह कुंडलेस यांनी सेतू सुविधा केंद्र ठाणे या ठिकाणी मोची जातीच प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अर्ज केला. पण शाळा सोडल्याचे मूळ प्रत सादर न केल्यामुळे तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर हरभजनसिंह कुंडलेस यांनी पुन्हा एकदा मोची जातीचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केला. हा अर्ज देखील एस आर नंबर नसल्याने फेटाळण्यात आला.

शेवटी हरभजनसिंह कुंडलेस यांनी बनावट कागदपत्र सादर करून स्वतःचा मोची जातीचा दाखला मिळवला. हरभजनसिंह कुंडलेस यांच्या बनावट कागपत्रांचा वापर करून ३०-०२-२०१३ रोजी नवनीत राणांनी मोची जातीचा दाखला मिळवला, अशी माहिती त्या तक्रारीत देण्यात आली आहे. या प्रमाणपत्राचा वापर करून नवनीत राणांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, असे देखील तक्रारीत सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ढसाढसा रडत रतन टाटांनी सांगीतले, ‘यापुढचे आयुष्य आरोग्यसेवेसाठी देणार’
सेलिब्रिटींसोबत दिसणारी ‘ही’ चिमुकली आहे प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार; इन्स्टावर आहेत लाखो फॉलोअर्स, जाणून घ्या तिच्याबद्दल..
अजय देवगण जी, किच्चा सुदीपावर ओरडण्याआधी जाणून घ्या ‘हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही राजभाषा आहे’

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now