…म्हणून मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत

बिहार निवडणुकीत भाजपा आघाडीवर असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पण आता मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप पुन्हा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देणार का? यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

कैलाश वीजयवर्गीय यांनी तर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, जर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर त्यांनी सिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपाचे नेते नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील असं एका सुरात सांगत आहेत. यासाठी त्यांनी शिवसेनेचे आभार मानावेत. कारण महाराष्ट्रात जो खेळ खेळण्याचा प्रयत्न झाला त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यांनतर भाजप आपल्या मित्रांशी तसं करणार नाही.

शब्द फिरवल्यानंतर काय होतं हर महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपला त्यांना करावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. फडणवीसांचे अभिनंदन करताना संजय राऊत म्हणाले की, जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे.

फडणवीस बिहारचे प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राचा चांगला अनुभव आहे. त्यांनी येथून बिहारची सूत्र नक्कीच हलवली असतील. संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी १७ ते १८ सभा घेतल्या. तरीही ३० वर्षांचे तेजस्वी यांनी कामाला लावलं आणि तोंडाला फेस आणला हे मान्य करावे लागेल.

महत्वाच्या बातम्या-

बिहार निवडणूक; देवेंद्र फडणवीसच विजयाचे शिल्पकार, पक्षाकडून कौतुक

सूर्यकुमार यादवच्या या अफलातून गोष्टीवर प्रचंड इंप्रेस आहे रोहीत शर्मा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.