“बिहारच्या डिजीपींना झालेला आनंद पाहून त्यांनी हातात भाजपचा झेंडा घेणंच बाकी होतं”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने काल सुशांत सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. निकाल सीबीआयकडे पाठवल्यानंतर अनेकांनी आपला आनंद सोशल माध्यामांवर व्यक्त केला. मात्र मुंबई पोलिसांसोबत बरं केलं नसल्याचं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखलं हे बरोबर नाही, असं संजय राऊत यांनी सामनामध्ये म्हंटल आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीचा प्रश्न आहे. कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावंच लागेल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा शंभर नंबरीच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. मुंबई पोलिसांचा तपास कायद्याच्या चौकटीत योग्य दिशेनेच सुरु होता. पण एखाद्या गोष्टीतचे भांडवल करायचेच म्हंटल्यावर काय होणार, असं म्हणत संजय राऊतांनी मुंबई पोलिसांवर दाखवलेल्या अविश्वास दाखवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

बिहारच्या डीजीपींना झालेला आनंद पाहून त्यांनी केवळ हातात भाजपचा झेंडा घेणं बाकी होतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. डीजीपी म्हणाले, हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय आहे. याच वक्तव्यावरून राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकाऱ्याला पाठवलं तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाइन करण्यात आलं. यावरुनच लोकांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत होतं, असं संजय राऊतांनी सामनामध्ये म्हंटल आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.