उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला फायदा होईल; संजय राऊत

राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांची नावे काल निश्चित झाली. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आले आहे. यासोबत उर्मिला यांचा शिवसेना प्रवेशही निश्चित झाला असून त्यांना प्रवक्तांच्या पॅनेलमध्येही संधी देण्यात येणार आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अभिनेत्री उर्मिला मातोडकरांचे नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिलासारखी स्पष्टवक्ता, देशासह महाराष्ट्राच्या घडामोडींची माहिती असणारी अभिनेत्री जर संसदेत जाईल, तर त्याचा निश्चितच फायदा होईल,” असे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यापाल नियुक्त १२ सदस्यांची नावे नाकरणार नाहीत,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध ठाकरे सरकार या संघर्षात उर्मिला यांनी सडेतोड भूमिका घेत कंगनाला चांगलेच फटकारले होते. त्यातूनच शिवसेनेतून उर्मिला यांचे नाव विधान परिषदेसाठी पुढे आले असावे.

“राज्य सरकारने जी यादी पाठवली आहे, ती घटनेच्या आधारे पाठवली आहे. राज्य सरकारने कधीही घटनाबाह्य काम केले नाही आणि करणारही नाही. राज्य सरकारने ती यादी सर्व पक्षांचे एकमत झाल्यानंतर पाठवली आहे, त्यात काय सांगायचे आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

अमेरीकेची इलेक्शन सिस्टीम चीनने हायजॅक केलीय, भारतातही तेच करण्याचा प्रयत्न – कंगणा

“पोलिसांनी मला जबरदस्तीनं काहीतरी द्रव्य पाजलं त्यामुळे माझा श्वास कोंडला”

MI च्या विजयानंतर रोहितने असे काहीतरी केले की तुम्हीही म्हणाल कॅप्टन असावा तर असा!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.