अर्णब प्रकरणातील ‘ते’ सत्य जर मी मांडले तर सर्वांना पळता भुई थोडी होईल; राऊत गरजले

अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या निषेर्धात काल भाजप रस्त्यावर उतरली होती. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “अर्णब प्रकरणी दिल्लीत काय हालचाली सुरू होत्या हे सत्य मी जर मांडले तर सर्वांना पळता भुई थोडी होईल” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

“भाजपचे हे आंदोलन म्हणजे अर्णव त्यांचे कार्यकर्तेच असावेत अशा आविर्भावात हे आंदोलन सुरू होते. भाजपचे बडे नेतेही प्रतिक्रिया देत होते. याप्रकरणी काल दिल्लीत पडद्यामागून नेमक्या काय हालचाली सुरू होत्या, हे सत्य मांडण्याचा प्रयत्न जर मी केला तर सर्वांची पळता भुई थोडी होईल”,असा इशारा त्यांनी दिला.

“अन्वय नाईक हे मराठी होते. त्यांनी अर्णब यांच्या स्टुडिओचे काम केले. त्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्या शॉकने त्यांच्या ८० वर्षीय सासूबाईही गेल्या. त्यामुळे भाजपने आंदोलन करण्यापूर्वी या मराठी कुटुंबावर काय संकट कोसळलले होते. हे पाहायला हवे होते. असे राऊत म्हणाले.

“नाईक कुटुंबीयांच्या भावना समजून घेणाऱ्या व्यक्तीला मन असेल तर तो अशा प्रकारे रस्त्यावर उतरणाच नाही. भाजपने तर यापुढे मानवता आणि सत्य हे शब्दच वापरू नये” असा टोलाही त्यांनी लगावला.

“काल भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. अर्णव त्यांचे कार्यकर्ते असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असतील. नाही तर ते रस्त्यावर उतरले नसते. कदाचित हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल. पण अर्णव यांना झालेली अटक हा चौथ्या स्तंभावर असलेला हल्ला आहे, असे मानायला पत्रकार तयार नाहीत. कारण हे प्रकरण पत्रकारितेशी संबंधित नसून आत्महत्येशी संबंधित आहे” असे ही त्यांनी सांगितले.

त्या दिवशी शाहरुखला त्याचा राग पडला होता महागात, झाली होती आयुष्यातली पहिली जेलवारी

कसलेही पैसे खर्च न करता फक्त काही मिनिटांत मोजा स्वतःची जमीन, वाचा सरळ सोपी पद्धत

एक रूपयाची नोट विका आणि लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.