Share

बापबेटे जेलमध्ये जाणारच; सोमय्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यावर सेनेचा ढाण्या वाघ कडाडला

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.(sanjay raut statement on somiya bail rejection)

या पोस्टमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हिंदी भाषेतील काही ओळी लिहीत भाजप नेते किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. “बाप मुलगा तुरुंगात जाणार…अनिल देशमुख नवाब मलिक यांच्या शेजारच्या कोठडीत राहणार “, अशा आशयाची पोस्ट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली आहे. संजय राऊत यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लिहिले आहे की, “आग लगाने वालो को कहां खबर, रुख हवाओं ने बदला, तो खाक वो भी होगे…”, असे संजय राऊत यांनी लिहिले आहे. अनेकांनी या पोस्टला लाइक केलं आहे. तसेच या पोस्टवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. एका युझरने कमेंट करत म्हंटले आहे की, “जबरदस्त राऊत साहेबांचा नाद नाही. जे बोलले ते करून दाखवले.

https://www.facebook.com/sanjayraut.official/posts/946376516059531

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी सैनिक बबन भोसले यांनी या प्रकरणात ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

“आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमा केला होता. मुंबईमध्ये सोमय्यांनी अनेक लोकांकडून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमवला होता. या पैशाचे काय झाले?”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

त्यानंतर आज आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी एक ट्विट केलं होतं. आता अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट शेअर करत किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘एसटी कामगारांवर ही वेळ का आली?’, पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी मराठी दिग्दर्शकाचा संतप्त सवाल
एकेकाळी विभूती नारायणच्या खिशात एक रुपयाही नव्हता, आता एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल ‘एवढे’ पैसै
“राज नव्हे तर उद्धवच बाळासाहेबांचे वारसदार, ते आमच्यासोबत येत नाहीत याचा आम्हाला खेद”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now