Share

त्यांना ५० खोके कधीच पचणार नाहीत, गुलाबरावांचा जुलाबराव होईल- संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी संजय राऊत(Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. “गुलाबरावांचा जुलाबराव होईल, त्यांना ५० खोके कधीच पचणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.(sanjay raut statament on mla gulbarao patil )

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेनं सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्व उभे केले, त्याचाच जर विसर या लोकांना पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाहीत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कार्यक्रमात सांगितले.

शिवसेना खासदार संजय राऊत मेळाव्यात म्हणाले की, “बंडखोर आमदारांनो कारण काय देताय? पहिल्या दिवशी म्हणाले आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी म्हणाले राष्ट्रवादीचे लोक आम्हाला निधी देत नव्हते. तिसऱ्या दिवशी म्हणाले की उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नव्हते.”

“खरं कारण त्यांच्याकडून लपवलं जात आहे. ईडीच्या तावडीमधून सुटका करण्यासाठी आणि पैशासाठी या सर्व आमदारांनी बंडखोरी केली आहे. आता हे सर्व आमदार वेगवेगळी कारणे देत आहेत. आता तरी या सर्व आमदारांनी या बंडखोरी मागचं कारण सांगावं”, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत मेळाव्यात पुढे म्हणाले की, “ही बंडखोरी नसून गद्दारी आहे. शिवसेना पक्ष सर्वसामान्यांच्या माध्यमातून उभारला गेला आहे. शिवसेनेने सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्व उभे केले. या गोष्टींचा जर बंडखोर आमदारांना विसर पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाहीत”, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

“सर्वसामान्य जनता अजूनही शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे. काही आमदारांनी पक्ष सोडला, पण त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही. बंडखोरीमुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पण बंडखोरी करणाऱ्या आमदारांना शिवसैनिकांची हाय लागणार”, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या :-
..आज त्यांच्याकडे ना पक्ष आहे ना चिन्ह, मनसेची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका
‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवणाऱ्या शिवसेनेला मनसेने डिवचलं, म्हणाले, ‘शिल्लक पक्ष’
महाविकास आघाडीला मोठा दणका; शिंदे सरकारकडून ५ हजार कोटींची कामे रद्द

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now