पंजाबातून आलेत म्हणून त्यांना खलिस्तानी म्हणणं हा देशातील शेतकऱ्यांचा अपमान

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी चलो दिल्ली आंदोलन सूरू केले आहे. यावर विरोधी पक्षाने भाजपवर टिका केली आहे. आता यात शिवसेना खाजदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे.

संजय राऊत म्हणाले, “कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला ज्या प्रकारे दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आलं आहे. यावरुन असं वाटतं हे कोणी बाहेरुन आलेले शेतकरी आहेत देशातील नाहीत. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही दहशतवाद्यांसारखी आहे. विशेषतः जे शीख आहेत आणि पंजाबमधून आले आहेत.”

“पंजाब आणि हरयाणातून आलेत म्हणून त्यांना विभाजनवादी, खलिस्तानवादी म्हणणं हा या देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर आपण पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी म्हणत असाल तर याचा अर्थ हा आहे की, आपण पुन्हा एकदा पंजाबमध्ये तोच काळ आणू इच्छिता, लोकांना आठवण करुन देऊ इच्छिता की आपण पुन्हा एकदा त्याच मार्गाने जावं, हे देशाच्या स्थिरतेसाठी चांगल नाही,” असे राऊत म्हणाले.

हैद्राबादचं नाव भाग्यनगर करणार-योगी; पिढ्या बर्बाद होतील पण नाव बदलनार नाही-औवेसी

“संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा आल्यामुळे ते जास्त फडफड करत आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.