‘असे येडे बरळतच असतात..’; कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांवर संजय राऊत खवळले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या विषयावरून चांगलेच फटकारले आहे. तसेच ‘असे येडे बरळतच असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा’ असा टोला सवदी यांना लगावला आहे.

काल कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ‘बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे,’ असे व्यक्तव्य केले होते. यावर संजय राऊत यांनी सवदी यांना चांगलच झापलं आहे. राऊत म्हणाले की, “असे येडे बरळतच असतात. सवदी यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा”.

तसेच “काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सागंतिलं तेच योग्य आहे. हा केवळ कर्नाटकचा प्रश्न नाही. दोन राज्यांच्या सीमांचा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे.” असेही राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “बेळगावमध्ये मराठीचं काय स्थान आहे? असे सवाल करतानाच कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही. आम्ही फक्त कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. मुंबईतील कानडींवर आम्ही कोणतीही सक्ती केली नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे.” असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेने ‘हा’ मतदारसंघ काॅंग्रेसला बहाल केला; विधानसभेसाठी झालेली सेटींग उघड

‘’मुंबईचा कर्नाटकात समावेश होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा’’

आकडा टाकायची गरज नाही; राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांसाठी महावितरणने आणली भन्नाट योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.