गेले काही दिवस भाजप शिवसेनेचे एकमेकांवर वार पलाटवार चालू आहेत. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचे नाव घेतले की कानाला त्रास होतो अशी टीका केली आहे. त्याला उत्तर देताना म्हटलं आहे की, “चांगली गोष्ट आहे. कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली आहे”. असा टोला राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
भाजपकडून सतत शिवसेनेवर टीका केली जात आहे. त्यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करताना ‘चंपा’, ‘टरबुज्या’ अशा पद्धतीची भाषा वापरली जात आहे. मग आम्हीही उद्धव ठाकरे यांना ‘उठा’, शरद पवार यांना ‘शपा’, जयंत पाटील यांना ‘जपा’ म्हणायचे का?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. यावर राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
तसेच उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “त्या शिवसैनिकच आहेत. बहुतेक उद्या प्रवेश करतील. त्यांच्यामुळे महिला आघाडी मजबूत होईल”.
“महत्वाच्या गोलंदाजाला दोन षटके देऊन थांबवत असाल तर विराटची कॅप्टन्सी न समजणारीच आहे”
रक्षकच झालेत भक्षक! पुण्यात पीएसआयला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले