‘बाळासाहेबांनीच भाजपला गावखेड्यात पोहचवले, भाजपच्या अस्तित्वाचे श्रेय त्यांनाच’

शिवसेना पक्षप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ वी जयंती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या. तसेच भाजपच्या अस्तित्वाविषयी मोठे विधान केले आहे.

“काही वर्षे मागे जात, गतकाळ आठवत महाराष्ट्रात त्यावेळी भाजप नव्हती, शिवसेनेचेच तेव्हा अस्तित्व होते. त्यावेळी बाळासाहेबांनी भाजपशी युती केली. त्यानंतर महाराष्ट्रातील गावागावात भाजपचाही प्रचार आणि प्रसार झाला. आमच्यासाठी ही बाब अभिमानास्पद होती. कारण, सर्वजण ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेच्या बळावर एकत्र आले होते”, असे संजय राऊत म्हणाले.

आज देशात मराठी माणूस अनेक ठिकाणी आहे. त्याचे श्रेय बाळासाहेबांना आहे. शिवाय राज्यात भाजपचे सध्या असणारे स्थान पाहता या पक्षाला गावखेड्यात पोहोचवणारेही खुद्द बाळासाहेबच होते ही बाबही संजय राऊत यांनी स्पष्ट केली.

बाळासाहेबांनी हिंदूत्वाची लाट निर्माण केली, आणि “मराठी लोकांच्या मनगटात लढण्याचं बळ आणलं. प्रादेशिक पक्षाचे राजकारणही बाळासाहेबांनी सुरू केले. महाराष्‍ट्रातील भाजप पक्षाच्या अस्‍तित्‍वाचे श्रेयही बाळासाहेबांनाच जाते. असा नेता शतकातून एकदाच होतो. त्‍यामुळे बाळासाहेब महाराष्‍ट्राच्या कायम स्‍मरणात राहतील, अशी भावना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्‍त केली.

काय म्हणावे आता ह्याला! एक दोन नाही तर इतक्या मुलांना सायकलवर बसवून नेत होता बहाद्दर; पहा व्हिडिओ

शिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा

तेव्हा बाळासाहेब अमिताभला म्हणाले, मी बघतोच कोण तुमचा चित्रपट रिलीज होऊ देत नाही

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.