देशातील हर चौथा मुसलमान भिकारी आहे – संजय राऊत

शिवसेनेचे मुखपत्र म्हणजेच सामनामधून शिवसेना नेते संजय राऊत संपादकीयच्या माध्यमातून वेगवेगळे विषय मांडत असतात. कधी राजकीय तर कधी सामाजिक विषयांवर ते संपादकीय लिहित असतात. यावेळी त्यांनी भिकारी या विषयावर ‘रोखठोक’ लिहले आहे.

नोटबंदी आणि लॉकडाऊनमुळे २३ कोटी जनता नव्याने गरिबी रेषेखाली गेली आहे. लोकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी भिक मागणे हा गुन्हा आहे, पण सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे की सरकारला गरीबांसाठी काही करणे शक्य नसेल तर भिक मागणे त्यांचा अधिकार आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

देशात भिकाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. हा एक सामाजिक विषय म्हणून बघायला हवा. आपल्या देशात भिकाऱ्यांची नक्की संख्या किती? मार्च २०२१ च्या सरकारी आकडेवारीनुसार देशात भिकाऱ्यांची संख्या चार लाखांहून अधिक आहे, पण नक्की किती आहे? हा गोंधळच आहे.

एकेकाळचा धनाढ्य विजय मल्ल्याला कोर्टाने दिवाळ खोर जाहीर केले. म्हणून तो सुद्धा कंगाल आणि भिकारीच झाला. मेहूल चोक्सी, नीरव मोदी, यांच्या बाबतीत तेच म्हणायला हवे.

देशात श्रीमंत भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. हजारो कोटींची सरकारी कर्जे बुडवून हे श्रीमंत स्वत:स दिवाळखोर म्हणून जाहीर करतात व पुन्हा त्याच श्रीमंती तोऱ्यात जगतात. या भिकाऱ्यांचे करायचे काय? हा प्रश्नच आहे. गरीब प्रार्थनास्थळांबाहेर उभा राहून भीक मागतो आणि श्रीमंत आत उभा राहून भीक मागतो, पण देव श्रीमंत भिकाऱ्यांनाच प्रसन्न होतो, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

देशातील हर चौथा मुसलमान भिकारी आहे, माहिती ही अस्वस्थ करणारी आहे. साधारण चार लाख भिकाऱ्यांमधील २५ टक्के मुसलमान आहे. मुसलमान भिकाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. त्यामागची कारणे तिहेरी तलाक होती. तो तिहेरी तलाक कायद्याने बंद केला हे महत्वाचे, असेही संजय राऊतांनी लेखात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

हेच खरे हिरो! बाळाला कडेला घेऊन कॉलेजमध्ये शिकवतो हा बाप, कारण ऐकून येईल डोळ्यात पाणी..
‘भुज’ चित्रपटातील नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ गाण्याने सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; पहा व्हिडिओ
आंघोळ करताना बाथरूममध्ये जास्तकरून हार्ट अटॅक का येतो? धक्कादायक कारण आले समोर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.