उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण देसाई (Bhushan Desai) याने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र संजय राऊत Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शिंदे गट आधी बापाला पळवत होता, आता मुलाला पळवत आहे. त्यांची भरती कुचकामी आहे. सामंत लोणीवाले हे मिंधे गट आहे. त्यांनी देसाईच्या चिरंजीवावर आरोप केला होता. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपचाही विरोध आहे.
भूषण देसाई यांनी सामाजिक क्षेत्रात एका पैशाचेही योगदान दिले नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला आहे. अशा भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या ओळखीच्या व्यक्तीला शिवसेनेत समाविष्ट करून शिंदे गटाने भाजप कार्यकर्त्यांची मने दुखावली असल्याची भावना व्यक्त करत भाजपचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
संजय राऊत म्हणाले, भूषण देसाई यांचा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी कधीच संबंध नव्हता. त्यामुळे ते कुठेही गेले तरी काही फरक पडत नाही. तसेच सुभाष देसाई यांनीही या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, आपल्या मुलाचे याआधी उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेशी कधीच संबंध नव्हते.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘त्यांची ही मेगा भरती व्यर्थ आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी भूषण देसाई यांच्यावर काही आरोप केले होते. त्याबाबतही त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. आता त्याच्या आरोपाचे काय होणार? ते डागही भाजपच्या वॉशिंग पावडरमध्ये धुतले जातील का?
तसेच, राऊत यांनी दोन्ही बाजु मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे भूषण देसाई यांचा ठाकरे गटाशी संबंध नव्हता हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनीही बापांना पळवून लावणाऱ्या शिंदे गटाने आता मुलांना पळायला लावल्याचा संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘वयाच्या या टप्प्यात मी खूप काही…’; मुलाने शिंदेगटात प्रवेश करताच सुभाष देसाईंची धक्कादायक प्रतिक्रीया
चिमुकल्याने लहान भावाच्या बर्थडेला केलेला जुगाड पाहून पाणावतील डोळे; भाकरीवर मेणबत्ती पेटवत…
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात