मुंबई | आज शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे.
यानंतर राऊत यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. यावेळी नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निकालावर भाष्य करतानाच राऊत यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, असा दावा केला.
याचबरोबर भाजपवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘मुंबई महापालिक निवडणूक असो की महाराष्ट्रातील निवडणूक, आम्ही एकत्र राहू. एकत्र राहण्याचे फायदे काल आलेल्या निवडणुकांनी दाखवून दिले आहेत, असे संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, ‘भाजपाच्या रणनितीविषयी मी कसं बोलणार. ते मास्टर्स स्ट्रेटजिस्ट आहेत. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक आहोत. आम्ही चर्चा करतो, निर्णय घेतो. कार्यकर्ते काम करतात. त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे,’ असे राऊत म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘पदवीधर मतदारसंघ, शिक्षण मतदारसंघातील मतदार विचार करून मत देणारा आहे. त्यांनी मतदानाचा कल दाखवला, तो महाराष्ट्राची दिशा दाखवणारा कल आहे. जे काल परवा सांगत होते की, या सरकारला जनमताचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा हा कशा पद्धतीने आहे, हे काल दिसले.’
महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकारमधील कुरबुरी पुन्हा चव्हाट्यावर! काँग्रेसकडून आघाडीतील नेत्यांना इशारा
“अजित दादा कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का”
‘एकटेच लढणार अन् जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली’