“महिंद्रांचा महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध, पण मोदींच्या लॉकडाऊनमध्ये आनंदाने थाळ्या पिटल्या”

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊन लावण्यात येण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र, पुन्हा लॉकडाउन करण्याला आता विरोध होताना दिसत आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. याचाच धागा पकडत शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून भाष्य केलं आहे. “पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुढे राऊत म्हणतात, ‘कोरोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉक डाऊन काळात लोकांना थाळय़ा व टाळय़ा पिटायला लावले. पण त्यामुळे कोरोना गेला नाही. कोरोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही.’

‘महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने राज्यात लॉक डाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळय़ा पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉक डाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नसल्याचेही राऊत म्हणाले.

दरम्यान, राऊत यांनी विरोधकांनाही लक्ष केले. “महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. पश्चिम बंगालात विधानसभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही.

मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. ‘लॉकडाऊन’चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे कोरोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही,” असेही राऊत यांनी नमूद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

खळबळजनक! मुंबईतील मनसे नेत्याला मारण्याची सुपारी ठाणे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून

आम्ही लोककलावंत आहोत ही आमची चूक आहे का? रघूवीर खेडकर व मंगला बनसोडे ढसाढसा रडल्या

कोरोना हेल्पलाईन व्यस्त! आईला बेड मिळावा म्हणून रात्रभर धावपळ केलेल्या मुलाच्या आईने गमावले प्राण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.