मुंबई | मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. याविरोधात कंगना राणावतने उच्च न्यालालयात धाव घेतली होती. याप्रकरणी महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीसही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत भाष्य केले आहे. ‘कंगनाने मुंबईची ‘पाकिस्तानव्याप्त काश्मिर’ अशी तुलना केली होती. तसेच मुंबई पोलिसांना माफीया म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. कोर्टाने दिलासा दिल्यानंतर उत्साही झालेल्या भाजपाला हे मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणं हा कोर्टाचा अवमान ठरतो. पण मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी अशी वक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का?” असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. याविरोधात कंगना राणावतने उच्च न्यालालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोना लस प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन; जाणून घ्या..
संजय राऊतांनी ईडी आणि सीबीआयला दिली कुत्र्याची उपमा; पहा नेमकं काय म्हणाले..
#coronavirus : ‘या’ नियमांसह राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला