अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर संजय राऊतांची तडाखेबाज प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. अशातच अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत,’ असे राऊत म्हणाले आहे.

याचबरोबर जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्याच्याशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचे मला वाटत नाही. पत्रकारांनीही आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असताना मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे मत संजय राऊत यांनी मांडले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

माश्याचा काटा घशात अडकल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय; १ मिनिटात निघून जाईल काटा
विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या पोरीला शक्ती कपूरने घरातून फरफटत आणले होते
दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.