मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ होण्याची चिन्हं आहेत. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, काल जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत. पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.’
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश…
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड यांच्या समर्थकांनी हरताळ फासला. पोहरादेवी परिसरात केवळ ५० जणांना जमण्याची परवानगी असताना हजारो लोक उपस्थित होते. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
शक्तिप्रदर्शनाबाबत शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड, म्हणतात…
संजय राठोडांवर शरद पवार प्रचंड नाराज; राजीनामा द्यावा लागणार?
पूजा चव्हाण प्रकरणात ‘गबरु’ची एन्ट्री; पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट