‘महाराष्ट्राच्या सातबारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन महाराष्ट्राचीच‘

मुंबई | केंद्रानं कांजूरमार्गमधील १०२ एकर जागेवर दावा केल्याने सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आहे. कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३च्या कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथील कारशेडचे काम थांबविण्याची सूचना केंद्राने राज्य सरकारला पत्राद्वारे केली होती.

याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा सवाल उपस्थित केला आहे. राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया. जय महाराष्ट्र”.

याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्रसरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्रसरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे,’ असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले होते. राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. याचबरोबर कारशेडचे बांधकाम सुरूच राहील, असे देखील यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच केंद्राने कांजूरमार्गमधील १०२ एकर जागेवर दावा सांगितला असताना राज्य सरकारने देखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांजूरमार्गमध्ये सुरू असलेले काम थांबणार नाही, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ‘मुंबई मिरर’ला दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

खळबळजनक! आ.त्मह.त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक
माश्याचा काटा घशात अडकल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय; १ मिनिटात निघून जाईल काटा
विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या पोरीला शक्ती कपूरने घरातून फरफटत आणले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.