…म्हणून चंद्रकांत दादा म्हणताय त्यांना माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊतांनी सांगितली ‘आतली’ गोष्ट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांच्या एका विधानाने राज्यच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका दोन ती दिवसांमध्येच कळेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यभरात त्यांचीच चर्चा सुरु आहे.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहे. आता शिवसेना नेते संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत दादा हे आमचे मित्र आहे. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांत दादा अवतारी पुरुष आहे. ते काहीतरी चमत्कार करतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना मी समजू शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला अजून २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच रहावे लागणार आहे. कारण उद्धवजींच्या नेतृत्वात हे महाविकास आघाडी सरकार पुढील २५ वर्षे चालणार आहे. त्यामुळे त्यांनी मनाची तयारी ठेवावी, असेही संजय राऊतंनी म्हटले आहे.

स्वप्न बघण्यावर कोणाताही टॅक्स नाही. तसेच ते नागालँडचे राज्यपाल होणार आहे. त्यांनी अशी ऑफर आली आहे. असे माझ्या कानावर आलंय, त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल असेल ही संजय राऊतांनी म्हटले आहे

आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही. स्वबळावर सत्ता हवी तर शिवसेनेला १५० जागा हव्या. आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही. तसेच शिवसेना असंख्य वार आणि घाव सहन करत इथपर्यंत पोहचली आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

शर्लिन चोप्राचे शिल्पा शेट्टी व राज कुंद्राबद्दल खळबळजन खुलासे; दोघांच्या नात्यात…
शाॅर्ट्स घातल्याने तरुणीला पेपरला बसू दिले नाही, शेवटी पडदा गुंडाळून द्यावा लागला पेपर
ठरलं! अजित पवार भाजपला पाडणार भलेमोठे खिंडार; स्वत:च केली घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.