“जाताय तर जा पण जाता जाता १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जा, तेवढंच पुण्य मिळेल”

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. तसेच अनेकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडी नेते एकमेकांवर टीकाही करताना दिसून येतात.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. आताही त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहे. कधी कधी मला वाटतं भगतसिंह तु जेव्हापासन आलाय. तेव्हापासून इथे दुष्काळ तर पडला नाहीये. पण तिथे डोंगरी भागातही पाऊसच पडत होता आणि इथेही पाऊसच पडत आहे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

तसेच मी इथे आल्यापासून अतिवृष्टी व्हायला लागली आहे. जर हे जयंतजींना वाटतंय तर मी लवकरात लवकर निघून जाईल, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते. आता त्यांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते काही बोलले असतील तर ते मला तुमच्याकडूनच कळतंय. पण ते राज्यात चांगले रमले होते. राजभवनात चांगले रमले होते. अनेक कामं करताना ते पक्ष कार्यही चांगले करत होते. त्यांच्या आणि इथल्या भाजपाचं चांगलं जुळलं होतं, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच आता ते जातंच असतील तर ठिके, पण जाता जाता १२ आमदारांच्या फाइलवर सही करुन जा. थोडं पुण्य तरी आपल्या पदरी पडेल, असाही टोला संजय राऊतांनी लगावला आहे. राज्यपालांच्या व्यक्तव्यानंतर संजय राऊतांना या वक्तव्याबाबत विचारकरण्यात आले होते, त्यावेळी संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुरावे मिळालेत, सोमवारी आणखी एका मंत्र्याचा घोटाळा समोर आणणार; किरीट सोमय्या पुन्हा बाॅम्ब फोडणार
“एवढ्या रात्री ती काय करत होती? तिचे कपडे चुकले असतील! सगळं तिचंच चुकलं असणार”
‘मुंबई इंडियन्स’ टीमला मोठा धक्का! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.