‘मुंबई महापालिक निवडणूक असो की महाराष्ट्रातील निवडणूक, आम्ही एकत्र राहू’

मुंबई | नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निकालावर भाष्य करतानाच राऊत यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, असा दावा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आज शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. यानंतर राऊत यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला.

दरम्यान, ‘भाजपाच्या रणनितीविषयी मी कसं बोलणार. ते मास्टर्स स्ट्रेटजिस्ट आहेत. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक आहोत. आम्ही चर्चा करतो, निर्णय घेतो. कार्यकर्ते काम करतात. त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे,’ असे राऊत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘पदवीधर मतदारसंघ, शिक्षण मतदारसंघातील मतदार विचार करून मत देणारा आहे. त्यांनी मतदानाचा कल दाखवला, तो महाराष्ट्राची दिशा दाखवणारा कल आहे. जे काल परवा सांगत होते की, या सरकारला जनमताचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा हा कशा पद्धतीने आहे, हे काल दिसले.’

याचबरोबर भाजपवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘मुंबई महापालिक निवडणूक असो की महाराष्ट्रातील निवडणूक, आम्ही एकत्र राहू. एकत्र राहण्याचे फायदे काल आलेल्या निवडणुकांनी दाखवून दिले आहेत, असे संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
डॉ. शीतल आमटे आत्मह.त्या प्रकरणात धक्कादायक माहिती; कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्मह.त्या?
लसीचा डोस घेतल्यानंतरही करोना का झाला? भारत बायोटेकने सांगितलं कारण…
वाह अजितदादा वाह! ती शपथ विसरलात?, भाजपचा सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.