शिवसेनेच्या ढाण्या वाघाची दिल्लीत डरकाळी; संजय राऊत पोहचले गाझीपूर बॉर्डरवर

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपण आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते.

त्यानुसार ते गाझीपूर सीमेवर पोहोचले होते. यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला.

‘शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून दिल्लीच्या सीमेवर खिळे लावले जात आहेत, हे खिळे जर भारत-चीन सीमेवर लावले असते तर चीनचं सैन्य भारतात घुसलं नसतं,’ असा टोला राऊत यांनी केंद्र सरकारला लावला आहे.

दरम्यान, तिकरी सीमेवर उभारण्यात आलेले खिळे, भिंती यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “एवढे मोठे खिळे चीनच्या सीमेवर लावले असते तर चिनी सैन्य २० किमी आत घुसले नसते”. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या
लोकल सेवेच्या वेळापत्रकात होणार बदल? राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा
कंगणा राणावत हाजीर हो; ‘या’प्रकरणात पुन्हा अडकली वादाची राणी
…अन् मध्यरात्री नाईट ड्रेसमध्येच नागरिक आले कोरोना लस घ्यायला; कारण वाचून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.