किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर संजय राऊत भडकले, म्हणाले…

मुंबई | वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जमीन विकल्याची कागदपत्रं दाखवून व्यवहाराच्या चौकशीची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना केली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. ‘अन्वय नाईक यांच्याशी २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर,’ अशा शब्दात राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

 

 

तसेच ‘एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून!” जय महाराष्ट्र, असे ट्विट राऊत यांनी केलं आहे. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील सोमय्यांवर निशाणा साधला. ‘ज्यानं एका मराठी बाईचं कुंकू पुसलं, अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासूनचे सर्व नेते करत आहेत, अशा तिखट शब्दात परब यांनी भाजपवर टीका केली आहे.

याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्या व्यवहाराची माहिती मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यातल्या जनतेला द्यावी, अशी मागणी सोमय्यांनी केली.

सोमय्या यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्विट करत‘ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत,” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘हे’ गुन्हेगार अर्णव गोस्वामी यांना का पाठीशी घालत आहेत? नाईक यांच्या कुटुंबीयांचा सवाल
मुलगी जन्माला आली आणि नशीबच बदललं; थेट भारतीय टीममध्ये झाली निवड
अर्णब गोस्वामींच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही आहे कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.