संजय राऊत (Sanjay Raut): शिवसेनेच्या विभाजनानंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. ठाकरे गटाला सतत एकामागून एक धक्के बसने सुरूच आहेत. यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने त्यांची कसून चौकशी केली.
ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग आढळून येत असल्याचे मत न्यायाधीशांनी मांडले.
रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजता राऊत यांना कोर्टात आणण्यात आले. १०३४ कोटींच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
कोर्टातील सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र प्राधिकरण म्हणजेच म्हाडाचा एक भूखंड मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळीमध्ये होता. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला हा भूखंड विकसित करण्यासाठी देण्यात आला होता. ही कंपनी प्रवीण राऊत यांच्या मालकीची होती.
या पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांनी तिथे राहत असलेल्या लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला. यातील अवैध पैशाचा लाभ संजय राऊत यांच्या कुटुंबाने घेतला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवीण राऊत यांना HDIL कडून ११२ कोटी रुपये मिळाले होते. त्यातून त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांना मिळाले असल्याचे निष्पन्न झाले.
या पैशातून संजय राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला असल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात संजय राऊत यांच्या परिवाराला थेट फायदा झाला आहे. तसेच अलिबाग येथे विकत घेतलेली जमीन याच पैशातून खरेदी करण्यात आली आहे, असा आरोप कोर्टामध्ये ईडीने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
नड्डा म्हणाले शिवसेना संपवणार, आता सेना नेते म्हणतात शिंदेंना स्वाभिमान असेल तर राजीनामा द्यावा
स्मृती इराणीच्या मुलीला मिळाली क्लीनचीट; ‘त्या’ रेस्तराँच्या प्रकरणात हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवलेला ‘हा’ बडा काँग्रेस नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत? राजकीय वर्तूळात खळबळ
शिवसेना काहीच दिवसांत संपून जाईल; जे.पी. नड्डांच्या या वक्तव्यावर ठाकरे संतापले; म्हणाले दुसऱ्यांना संपवण्याच्या नादात…