‘आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?’

मुंबई | दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया येत आहेत.

आता या शेतकरी आंदोलनाचे पडसाद संसदीय अधिवेशनात उमटताना दिसत आहेत. संसदेत सरकारला प्रश्न विचारत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दीप सिद्धूला अटक कधी करणार ? असा प्रश्न संसदेत उपस्थित केला. तसेच ते म्हणाले, ‘सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते.’

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते योग्य नाही. तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी आहे. पण सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केली जात नाही. ‘

मात्र सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केलीये, असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, खा सुप्रिया सुळेंसह १० खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून गाझीपूर सीमारेषेवरील शेतकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटा आक्रमक
शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीने ठाकरे सरकारमध्ये उलथापालथीचे संकेत? वाचा सविस्तर   
भाजपा आमदारावर लैंगिक अत्या.चार केल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.