संजय राऊत आज लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार दाखल, कारण…

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लीलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू हे संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करणार आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने एप्रिल २०२० ही नियोजित वेळ करण्यात आली होती. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

यानंतर आज त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. आणि उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्रास वाढू लागल्याने पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.

मोठ्या प्रमाणात कामात व्यस्त असणारे राऊत खासदारपद, पक्षाचे मुख्य प्रवक्ते, ‘दैनिक सामना’चे कार्यकारी संपादकपद, महाविकास आघाडीचे शिल्पकार अशा विविध भूमिका पार पाडत असतात.

भयानक अपघातात बॉलीवूड अभिनेते महावीर शाहचा आणि त्यांच्या कुटुंबाचा झाला होता मृत्यू

देश जळत असताना मोदींनी गाण्यावर धरलाय ठेका, विडिओ व्हायरल करत विरोधकांची टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.