..तेव्हा संजय राऊत ततपप करत बाथरूममध्ये लपले होते; राणेंनी केला गौप्यस्फोट

मुंबई । राजकारणामध्ये कोण काय करेल सांगता येत नाही. कधी काय घडेल हे देखील सांगता येत नाही. अनेक वेगवेगळ्या कारणांवरून विरोधक एकमेकांना टीका करताना दिसून येतात.

अशाप्रकारे भाजप आणि प्रसाद लाड यांनी सेनाभवन फोडण्याची भाषा आणि संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखात भाजपमधील नेत्यांवर करण्यात आलेली टीका यावरून राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असे जोरदार राजकारण आता रंगताना दिसत आहे.

भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली आहे.

त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिला आहे. तसेच राऊतांवर जोरदार हल्लाही त्यांनी चढवला आहे. ते म्हणाले, महामंडळे, पदे सगळ्या खास लोकांना, बाळासाहेबांचे निष्ठावंत दिसले नाहीत.

बाटग्यांच्या माध्यमातून चालणारी शिवसेना आहे, असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिला आहे. तसेच नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होते, आणि आता धमक्यांची भाषा वापरली जात आहे. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही.

सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे. लोकप्रभामध्ये असताना संजय राऊतांनी बाळासाहेबांसाठी काय भाषा वापरली होती ते पाहावे, नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन सांगतो की त्यांनी काय म्हटले होते.

संजय राऊतांनी जेवढ्यास तेवढे राहावे नाहीतर कुंडली काढू, शिवसेनेबद्दल आकस नाही. समोरुन टीका टिप्पणी होत असेल तर गप्प बसणार नाही. संजय राऊत हे शरद पवार यांचे काम करतात. त्यांना शिवसेनेशी काही देणेघेणे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

बलात्कार करणाऱ्या आरोपीशीच लग्न करायला निघाली तरुणी; आरोपीला मिळाली होती २० वर्षांची शिक्षा

होय आम्ही शिवसैनिकच आहोत आणि मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार; राणेंची स्पष्ट कबुली

बाबो! वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या आजोबांनी बांधली 40 वर्षीय महिलेशी लग्नगाठ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.