“सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि सरकार स्थापन केले”

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची महत्वाची भुमिका होती. पण महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना म्हटले जाते. असे असताना काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी सरकार स्थापनेचे सर्व श्रेय संजय राऊतांना दिले आहे.

संजय राऊतांच्या अंगात आले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, असे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. सरकार स्थापनेचे सर्व श्रेय संजय राऊतांना देत विश्वजीत कदम यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

मंत्री विश्वजीत कदम हे सोलापूरातील काँग्रेस मेळाव्यात बोलत होते. यावेळी विश्वजीत कदम यांनी सरकार निर्मितीच्या प्रक्रियेवरही भाष्य केले आहे. संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून बरं झालं, त्यांच्या अंगात आल्यानेच महाराष्ट्राच्या इतिहासात जे झालं नाही ते घडलं, असे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.

मी माझ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मला मतदान केलं तरी मी विरोधी पक्षाचा आमदार होणार असं मतदारांना सांगत होतो. कारण नुकतीच लोकसभेची निवडणूक आली होती आणि भाजपचे सरकार स्थापन झाले होते. पण विधानसभेच्या निवडणूकीनंतर दोन महिन्यानंतर संजय राऊतांच्या अंगात आलं आणि सरकार स्थापन झालं, असे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.

महिन्याभराच्या सत्ता नाट्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. या महाविकास आघाडी सरकार स्थापनेचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना म्हटले जाते,

विविध पक्षांचे नेतेही निर्विवादपणे शरद पवार यांनीच या सरकार स्थापनेत प्रमुख भुमिका बजावली होती, असे म्हणतात. तसेच शरद पवारांनाच सर्व श्रेय देतात. पण मंत्री विश्वजीत कदम यांनी थेट पवारांना डावलून संजय राऊतांनाच सरकार स्थापनेचे श्रेय दिल्यामुळे सगळीकडे या वक्तव्याचीच चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानपेक्षा जास्त सुरक्षित कोणतीच जागा नाही, म्हणणाऱ्या वसीम अक्रमच्या पत्नीला पाकिस्तानी लोकांनीच झोडले
लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदीने ठेवले नव्या व्यवसायात पाऊल; जाणून घ्या तिच्या नवीन व्यवसायाबद्दल
१९७१ च्या भारत-पाक युद्धातील भारतीय विजयी रणगाड्यांचा धुराळा येणार रुपेरी पडद्यावर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.