कोर्टाला काही वाईट बोललं तर तो अवमान मग मुंबई महाराष्ट्राला बोललं तर ती बदनामी नाही का?

मुंबई | मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. याविरोधात कंगना राणावतने उच्च न्यालालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीसही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंगनाने तिच्या पाली हिलमधील बंगल्यावर मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत भाष्य केले आहे. ‘कंगनाने मुंबईची ‘पाकिस्तानव्याप्त काश्मिर’ अशी तुलना केली होती. तसेच मुंबई पोलिसांना माफीया म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. कोर्टाने दिलासा दिल्यानंतर उत्साही झालेल्या भाजपाला हे मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणं हा कोर्टाचा अवमान ठरतो. पण मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी अशी वक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का?” असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

स्वत:ला आवरा; कोर्टाने कंगनाची केली कानउघडणी….
कंगनाला सुद्धा कोर्टाने समज दिली आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. भविष्यात तिला अश्याप्रकारची वक्तव्य करताना भान बाळगण्याची समज हायकोर्टाने दिली आहे.

तुम्ही व्हिलन झालात म्हणून मी हिरो झाले…
कंगणाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली असून हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले आहे. तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरली असा टोलाही तिने लगावला आहे.

कंगणा म्हणतीये, जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि विजय मिळवते तेव्हा हा त्याचा एकट्याचा नाही तर लोकशाहीचा विजय असतो. मला हिंमत देणाऱ्या सर्वांचे आभार आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसणाऱ्यांचेही आभार. कारण तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले.’

महत्त्वाच्या बातम्या
कोरोना विषाणूचा जन्म भारतात, तिथूनच जगभरात पसरला; चीनचे संशोधक बरळले
शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे; बॉक्सर विजेंदर सिंग म्हणतोय, ‘अण्णा हजारे आता कुठे आहात तुम्ही?
पंढरीचा पैलवान गेला! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तडफदार आमदार भारत भालके यांचं पुण्यात निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.