संजय राऊतांनी ईडी आणि सीबीआयला दिली कुत्र्याची उपमा; पहा नेमकं काय म्हणाले..

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने छापे मारले आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग यांनाही ईडीने ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तब्बल विहंग यांची ताब्यात पाच तास चौकशी करण्यात आली.

ईडीने केलेल्या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत भाजपावर निशाणा साधला. राऊत यांनी शेअर केल्येला ट्विटमध्ये दोन श्वान पाहायला मिळत आहे.

एका श्वानासमोर ED तर श्वानासमोर CBI असे लिहिण्यात आले आहे. समोर महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा बोर्ड देखील पाहायला मिळतोय. या व्यंगचित्रावरील कॅप्शनमध्ये “रुक ! अभी तै नहीं है किसके घर जाना हैं” असं लिहिले आहे.

दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. या कारवाईनंतर शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. ईडी आणि सीबीआय हे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं झालं आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या
#coronavirus : ‘या’ नियमांसह राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला
‘मुख्यमंत्र्यांची सामनातील मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीची नाही’
“महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.