वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला; सेनेचा ढाण्या वाघ कडाडला

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टानं त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

या सर्व प्रकरणावरुन शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे , हे आश्चर्यच आहे, असं सामनात म्हटले आहे.

तसेच सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे, असेही सेनेने म्हटले आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा मार्ग मोकळा झाला.

याचबरोबर ‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच शनिवारी NIA ने सचिन वाझे यांनी तब्बल १३ तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली. वाझे यांना अटक करताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

महत्त्वाच्या बातम्या 

अभिनेत्री परिणीती चोप्रा झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या पाठिशी, म्हणाली…

इशान किशनची गर्लफ्रेंड आहे मॉडेल, हॉट फोटोंचा सोशल मिडीयावर धुराळा

अभिनेते जॅकी श्रॉफला घरकाम करणाऱ्या तरूणीच्या आजीचं निधन झाल्याचं समजलं अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.