राऊतांनी काढला विरोधकांना चिमटा; ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या, पण…

मुंबई | ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण ठाकरे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त करत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे. ठाकरे सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असा ठाम विश्वास देखील राऊतांनी व्यक्त केला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना राऊतांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेविषयी भाष्य केले आहे. हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही असं काही लोकांना वाटत होतं, पण माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल असं वाटत होतं त्यानुसार झालं, असे ते म्हणाले.

याचबरोबर ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, पंकजा मुंडे या शिवसेनेत येणार आहेत का?, असा सवाल केला असता पंकजाला आम्ही ऑफर दिली नाही. आमच्याकडे उद्धव ठाकरेच ऑफर देतात. दुसरं तिसरं कुणी देत नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
नशेत मी शाहरुखला प्रचंड त्रास दिला; स्वरा भास्करने सांगितला किस्सा
कोणाला खुश करण्यासाठी जर काम करत असतील तर गाठ आमच्याशी; आव्हाडांचा इशारा
तुम्ही मागे फिरा आम्ही हटणार नाही; चिनी लष्कर अधिकाऱ्यांना भारताने सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.